Ad will apear here
Next
डहाणू येथील विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स एक्सप्रेस’ भेटीचे आयोजन
प्रातिनिधिक फोटोडहाणू (पालघर) : पालघर जिल्हा परिषद आणि मुंबईतील रोशनी फाउंडेशन यांच्या वतीने डहाणू येथील बाहारे आणि जामशेत सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे १९ जुलै रोजी येणाऱ्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 पन्नास विद्यार्थी व पाच शिक्षक यांना ही शैक्षणिक सहल नि:शुल्क आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

 मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, पर्यावरण वन आणि पर्यावरणबदल मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यामार्फत विज्ञान विशेष रेल्वे गाडी भारतभर भ्रमण करत आहे. ही रेल्वेगाडी १९ ते २२ जुलै दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे थांबणार  आहे. ही विज्ञान एक्स्प्रेस देशभरातील विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZINBE
Similar Posts
डहाणू येथील विद्यार्थ्यांची सायन्स एक्स्प्रेसला भेट डहाणू (पालघर) : डहाणू येथील बाहारे आणि जामशेत, सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे १९ जुलै रोजी ‘विज्ञान एक्सप्रेस’ला भेट दिली. पालघर जिल्हा परिषद आणि रोशनी फाउंडेशन यांनी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही विज्ञान विशेष गाडी
डहाणूमध्ये पुनरागमन आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिर डहाणू (पालघर) : नोव्हेंबर-डिसेंबर २०१६मध्ये डहाणू तालुक्यातून हजारोंच्या संख्येने वीटभट्ट्या व बांधकाम आणि इतर कामांसाठी स्थलांतरित झालेल्या बहुतांश कुटुंबांचे गावामध्ये पुनरागमन झाले आहे. या सर्व कुटुंबांची तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याकरिता डहाणूच्या
धडा श्रमदानाचा आणि स्वच्छतेचा टोकेपाडा (डहाणू) : कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, याचा धडा टोकेपाडा, घोलवड (ता. डहाणू, जि. पालघर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी घालून दिला. दीपक देसले असे त्यांचे नाव आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी त्या संदर्भातील माहिती दिली
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language